राष्ट्रीय
हनिफ हरचिरकर यांची रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या ग्राहक समितीवर निवड
देवरूख( सुरेश सप्रे) : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा ग्राहक सेवा समितीच्या सदस्यपदी संगमेश्वर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या प्रियदर्शनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हनिफ हरचिरकर यांची निवड करण्यात आली आहे.
हरचिरकर यांनी सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जिल्हा ग्राहक सेवा समिती सदस्य पदी निवड करणेत आली. हि निवड झाल्याबद्दल आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ, तानाजी चोरगे व स्थानिक संचालक राजेंद्र सुर्वे व सौ. नेहा माने व बँकेचे सर्व संचालक यांनी हरचिरकर यांना शुभेच्छा दिल्या.
या समितीवर नियुक्ती करण्यात आलेबद्दल हनिफ शेठ हरचिरकर यांचेवर देवरुख शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.