Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला ६.४८ लाखांचे उत्पन्न

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मुंबई मडगाव अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 27 जून रोजी च्या उद्घाटन फेरीनंतर आज 28 रोजी पहिल्याच नियमित फेरीतून मध्य रेल्वेला सहा लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक 28 रोजी झालेल्या पहिल्या फेरीला प्रवाशांकडून उत्साही प्रतिसाद लाभला. एकूण 530 आसनांपैकी 477 इतक्या आसनांचे म्हणजे 90 इतके आरक्षण झाले. प्रवाशांकडून पहिल्याच दिवशी लाभलेला हा प्रतिसाद रेल्वेसाठी उत्साहवर्धक ठरला आहे.

गणेशोत्सवासाठी झाले 110 टक्के आगाऊ बुकिंग


गणेशोत्सवात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस चे आरक्षण खुले होताच बुधवारपर्यंत गणेशोत्सव कालावधीतील दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 20 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसकरिता तब्बल 110 टक्के इतके आगाऊ आरक्षण झाले आहे.

हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पॉझिटिव्ह ‘सिग्नल’

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment