कृषिदुतांनी सांगितले आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्व
- गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचा कुटरे येथे मार्गदर्शन कार्यक्रम
चिपळूण : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जे. वाय. शिर्के हायस्कुल कुटरे येथील विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी राबविला.
अमली पदार्थांचे व्यसन हा एक असा आजार आहे जो तरुण पिढीवर सतत परिणाम करत आहे. तरुणांचा मोठा वर्ग दारू, सिगारेट, तंबाखू, अंमली पदार्थ यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची वेळीच माहिती असणे आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थांच्या दुरुपयोगमुक्त जगासाठी कृती आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो अशी माहिती कृषिदूत ऋषिकेश क्षीरसागर यांनी दिली. सहा. शिक्षक पी. जी. पाटील यांनी व्यसनाचे कुटुंबावर, समाजावर होणारे दुष्परिणाम समजावले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सी. सी. सावंत, सहा. शिक्षक पी. जी. पाटील, सहा. शिक्षक एन. टी. घडशी, कर्मचारी श्री. डी. बी. कोकरे, कृषिदूत ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, अनिकेत मस्के, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके, हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्तावना अतुल निळे तर आभार अनिकेत मस्के यांनी मानले.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
- कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!