राजकीय

नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसतर्फे सत्कार

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : या अगोदरच्या झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीपेक्षा या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष रस दाखवला.काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस विशेष मेहनत घेउन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आले. यातून जनतेचा मोठा विश्वास काँग्रेस पक्षावर दिसून आला आहे. असेच रात्रंदिवस मेहनत घेउन काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे काम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावे. काँग्रेस पक्षाचा प्रचार, प्रसार तळागाळात करावा. असे आवाहन महेंद्र घरत यांनी केले.

उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे उरण तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा भोईर लॉन्च, कोटनाका येथे दि. 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कामगार नेते तथा रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महेंद्र घरत मार्गदर्शन करताना म्हणाले की, उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये सर्वच ठिकाणी चुरशीचा सामना रंगला होता. अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाला मोठे आव्हान उभे होते. मात्र या सर्व आव्हानांना तोंड देत काँग्रेस पक्षाचे सरपंच सदस्या बहुमताने निवडून आले निश्चितच ही आनदांची, गौरवाची बाब आहे. रात्रंदिवस पक्षासाठी कार्यरत असणाऱ्यांचा सत्कार झालाच पाहिजे. निवडणूकीत काँग्रेसतर्फे उभे असलेले सरपंच, सदस्य यांनी आव्हान दिल्याने व कठीण प्रसंगावर मात करून निवडून आल्याने सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आल्याचे महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी केले.काँग्रेस पक्षाचे 3 सरपंच,25 ग्रामपंचायत सदस्य मोठ्या बहुमताने निवडून आल्याचे सांगत विनोद म्हात्रे यांनी प्रस्तावनेत सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकत्र येऊन हेवेदावे विसरून काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी उरण तालुक्यातील सरपंच सुचिता ठाकूर, सरपंच कलावती पाटील,ग्रामपंचायत सदस्य कुंदन ठाकूर, नितेश पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे जिल्हा ज्येष्ठ तथा वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ मनिष पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री,जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश भोईर,जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी,जिल्हा सरचिटणीस गणेश सेवक,महिला जिल्हा उपाध्यक्ष संध्या ठाकूर,तालुका सेवादल अध्यक्ष गणेश सेवक, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत,तालुका चिटणीस जयवंत पाटील,पदाधिकारी कृष्णा पाटील, अशोक ठाकूर आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी किरीट पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button