Adsense
राजकीय

शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार : सुभाष देसाई

उरणमधील शिवगर्जना अभियानास उत्तम प्रतिसाद

उरण (विठ्ठल ममताबादे) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याच्या अनुषंगाने व पक्षाचे संघटन करून पक्ष संघटना आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टीने उरण विधानसभा मतदार संघातर्फे शनिवार दि. 04 मार्च 2023 रोजी सांयकाळी 6 वाजता जे. एन. पी.टी. मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप, उरण येथे शिवगर्जना अभियान व शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जेष्ठ नेते माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी युवासेना कार्यकारीणी सदस्य कु राजोल पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख तथा जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रघुनाथ पाटील, संपर्कप्रमुख महादेव घरत, जे पी म्हात्रे,भरत भगत, उरण नगर परिषद गटनेते गणेश शिंदे, युवा नेते दीपक भोईर, केवळ माळी, नगरसेविका विद्या म्हात्रे, महिला आघाडीच्या सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, ज्योती म्हात्रे, प्रणिता म्हात्रे,मेघा दमडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जेष्ठ नेते माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई या वेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते विचारतात की शिवसेनेकडे काय राहिले चिन्ह गेले, पक्षाचे नाव हिसकावून घेतले तुमच्याकडे आता काय राहिले या प्रश्न बाबतीत मला भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की अमिताभ बच्चनची एक फिल्म आहे. त्यात दोन भाऊ एकमेकांशी बोलतू मोठा भाउ धाकट्या भावाला विचारतो तुझ्याकडे काय आहे.माझ्याकडे बॅक बॅलन्स आहे. गाड़ी घोड़ा बंगला नोकर चाकर आहे तुझ्याकडे काय आहे.असा प्रश्न मोठ्या भावाने धाकट्या भावाला विचारला असता धाकट्या भावाने मेरे पास माँ है असे उत्तर दिले. आज आमच्याकडे चिन्ह नसेल, पक्षाचे नाव नसेल पण आमच्याकडे मातोश्री आहे.आमच्याकडे उद्धव ठाकरे साहेब आहेत. हिच खूप मोठी संपत्ती आहे.ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना तर आम्ही धडा शिकविणारक आहोत . शिवाय शिवसेनेचे गेलेले चिन्ह, नाव परत मिळावून देण्यासाठी व शिवसेनेला पूर्वी सारखे वैभव मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढतच राहणार असे भावनिक उदगार माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उरण येथे काढले.

येणाऱ्या नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निवडणूक या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळवून सर्वच निवडणुका मध्ये शिवसेना अग्रेसर राहिल. असे आत्मविश्वास व्यक्त करत सुभाष देसाई यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.भाजप कडुन पदाधिकारी कार्यकर्त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जातो.भाजपने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आता निवडून देऊ नका. शिवसेनेचा विचार तळागाळात पोहोचवा असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी केले.संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांनीही भाजप वर चौफेर टीका केली. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेलाच घवघवीत यश मिळेल व जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचेच निवडून येतील.मागच्या वेळी झालेली चूक पुन्हा करणार नाही असे सांगत बबनदादा पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना गाफिल राहू नका असा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आतिष पाटील यांनी केले. उरण विधानसभा मतदारसंघाच्या या शिवगर्जना अभियान व शिवसैनिक मेळाव्याचे सुदंर नियोजन जेएनपीटीचे विश्वस्त जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी केले . या मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्याचा मोठा प्रतिसाद मिळाला.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button