राजकीय
नीलेश भुरवणे यांची जिल्हा भाजपा सरचिटणीसपदी निवड
देवरूख ( सुरेश सप्रे) : देवरुख शहराचे माजी नगराध्यक्ष कुणबी समाजाचे युवा नेते नीलेश विठ्ठल भुरवणे यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
देवरुख शहराचे माजी नगराध्यक्ष निलेश भुरवणे यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टी युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीसह देवरुख शहराचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली आहे.
देवरुख नगर पंचायतीच्या मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला थेट नगराध्यक्ष पद व सत्ता मिळवून देण्यामध्ये श्री. भुरवणे यांचा सिंहाचा वाटा होता
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी याची घोषणा रत्नागिरी येथे भाजपा कार्यालय येथे केली.