मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या खेडमध्ये धडाडणार!
खेड : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झालेल्या येथील गोळीबार मैदानावर दिनांक 19 मार्च २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विराट सभा होणार आहे. या विराट सभेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सभास्थळी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
दि. १९ मार्च रोजी गोळीबार मैदान, खेड येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या जाहीर विराट सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणारी सभा म्हणून या सभेकडे पाहिले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेत काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारमधील विविध मंत्री, नेते या विराट सभेला उपस्थित राहणार आहेत.