राजकीय
शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीची आशीर्वाद यात्रा
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सहभाग
मुंबई : शिवसेना – भाजपा – रिपाइं महायुतीतर्फ काढण्यात आलेल्या विलेपार्ले येथील आशीर्वाद यात्रेचे प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. या यात्रेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सहभागी झाले होते.
तिन्ही पक्षातील तरुण कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने आशीर्वाद रॅली सहभागी झाले होते. यावेळी आ.पराग अळवणी, आ. मंगेश कुडाळकर, कुणाल सरमळकर व सर्व संबंधित उपस्थित होते.