राजकीय
‘आप’च्या रत्नागिरी जिल्हा संयोजकपदी परेश साळवी
रत्नागिरी : आम आदमी पक्ष दापोली तालुका संयोजकपदी कार्यरत असलेले परेश साळवी यांची आम आदमी पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संयोजकपदी अंतरिम नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती श्री ज्योतिप्रभा पाटील येत्या काही दिवसांसाठी पक्षाचे काम करण्याकरिता गैरहजर असल्याने करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखपदी पुढील नियुक्ती होईपर्यंत श्री. साळवी या पदावर असतील, आणि लवकरच स्थानिक समिती व सदस्यत्वाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली आहे.