सायन्स & टेक्नॉलॉजी
आडिवरेतील राज पांचाळला इन्स्पायर ॲवॉर्ड मानांकन!
बॅटरीवर चालणाऱ्या पाण्याचे पंप प्रतिकृतीला दरमहा दहा हजार रुपयांचे पारितोषिक
आडिवरे : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली इग्लिश स्कूलच्या राज रोशन पांचाळ या विद्यार्थ्याने तयार केलेल्या साध्या बॅटरीवर चालणाऱ्या पाणी पंप प्रतिकृतीला इन्स्पायर अवॉर्डसाठी मानांकन झाले असून त्याला शासनाकडून दहा हजार रूपयांचे पारीतोषिक जाहीर झाले आहे.
इन्पायर अॅवॉर्डसाठी ऑनलाईन सादर झालेल्या जिल्ह्यातील ३८ प्रतिकृतींमधून मधुरा नाईक, स्वप्नील भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजने बनविलेल्या प्रतिकृतीची निवड झाली आहे. या प्रतिकृतामधून राज्यस्तरासाठी निवड होणार आहे. साधी बॅटरी, डिसी मोटर आणि पाईपचा वापर करून त्याने हा पंप तयार केला आहे.
या यशाबद्दल राज व मार्गदर्शकांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.