सायन्स & टेक्नॉलॉजी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये पिता – पुत्राचे यश

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्याचे ५० वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन कसोप फणसोप येथे नुकतेच पार पडले . कुमार फरहान इम्तियाज शेख (सी. बी. एस. ई. )फातीमा कॉन्व्हेन्ट स्कूल , यांने उच्च प्राथमिक स्तरातून विज्ञान प्रतिकृती (मोबाईल इनव्हर्टर ) मांडले होते याला द्वितीय क्रमांक मिळुन जिल्हास्तरा साठी निवड झाली आहे, तर इम्तियाज कुतबुदिन शेख ए.डी. नाईक हायस्कूलचे (कलाध्यापक ) यांनी माध्यमिक गटातून , ( साऊंड वेव्हज एन्ड साऊंड पॉल्युशन ) हे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनामध्ये मांडले होते. या शैक्षणिक साधनची देखील द्वितीय क्रमांकाने सन्मानीत करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. एकाच मंचावर पिता – पुत्राने द्वितीय क्रमांक पटकावून सन्मान स्विकारुन, जिल्हास्तरासाठी निवड होण्याच्या बहुमान किंवा योग्य क्वचित येतो .

विज्ञान प्रेमी शिक्षक, मित्र परिवार यांनी शेख पिता पुत्राच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर शेख , मुख्याध्यापक समीर गडबडे तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button