सायन्स & टेक्नॉलॉजी
फसवाफसवी चालणार नाही! सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फेस रिकग्निशन’ ॲपवर हजेरी द्यावी लागणार!
सरकारी सेवेतील पारदर्शकतेसाठी आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय
गुंटूर ( आंध्र प्रदेश ): लोकांना सेवा देण्यात कर्मचाऱ्यांकडून चालढकल होऊ नये, सर्वसामान्यांना वेळेत सेवा मिळावी यासाठी आंध्र प्रदेश सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची हजेरी फेशियल अटेंडन्स ॲप द्वारे द्यावी लागणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव के एस जवाहर रेड्डी यांनी या संदर्भात निर्देश जारी केले आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने सोमवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव ते अगदी गाव पातळीवरील अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना आपली हजेरी फेस रिकग्निशन ॲप द्वारे द्यावी लागणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांकडून लोकांना सेवा देताना कुठली हयगय होऊ नये व पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी 26 डिसेंबर रोजी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत