स्पोर्ट्स
जळगावमधील राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी युवा तायक्वांडो अकॅडमीच्या तीन खेळाडूंची निवड
रत्नागिरी : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचा वतीने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्य ज्युनियर व सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी युवा मार्शलआर्ट तायक्वांडो ट्रेनिग सेंटर, रत्नागिरी साळवी, स्टॉप, रत्नागिरी येथील प्रशिक्षण वर्गातील तीन खेळाडूंची निवड झाली आहे.
निवड झालेल्या या तीन खेळाडूंमध्ये मयुरी कदम, शाशीरेखा कररा, अमित जाधव यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे मिलिंद पाठारे, रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे पदाधिकारी व्यंकटेस्वरराव कररा, सचिव लक्ष्मण कररा व खजिनदार शाशक घडशी युवा तायक्वांडो अकॅडमीचे अध्यक्ष राम कररा व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले