स्पोर्ट्स

‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून रमेश पाटील यांची निवड

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड होणारे पाटील एकमेव शरीर सौष्ठवपटू

उरण (विठ्ठल ममताबादे) : शरीरसौष्ठव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सुपुत्र रमेश पाटील यांची ‘मिस्टर इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेले महाराष्ट्रातील हे एकमेव शरीरसौष्ठवपटू आहेत

पाटील आतापर्यंत विविध स्पर्धेत अनेक गोल्ड मेडल पटकाविली आहेत त्यांना उत्कृष्ट कामगिरी मूळे महाराष्ट्र श्री गोल्ड मेडल, द्रोणागिरी श्री टायटल चैम्पियन ऑफ चॅम्पियन, वेलर क्लासिक क्रमांक 5 असे अनेक पारितोषिके मिळाली आहेत. आता त्यांची निवड मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. रमेश पाटील हे स्टॉम फिटनेस कोप्रोली येथे व्यायामाचे, फिटनेसचे ट्रेनिंग घेत आहेत. रमेश पाटील यांना आर्यन पाटील, आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर तथा कोच सिद्धेश शिंदे,निशिकांत घरत, ashiष पाटील,अनिकेत पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते. रमेश पाटील यांना घडविण्यासाठी तसेच स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय कोच सिद्धेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

रमेश पाटील यांची निवड मि. इंडियांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी झाल्याने जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच अनेक जणांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून रमेश पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button