राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी संगमेश्वरातील तनुश्री नारकर हिची निवड
संगमेश्वर : या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या तनुश्री गणेश नारकर हिची निवड 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हैद्राबाद तेलंगणा येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे.
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 5 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा दि. 12ते 14 फेब्रुवारी दरम्यान वर्धा येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगर पंचायत देवरुखच्या 2 तायक्वांडोपट्टुंनी सहभाग नोंदविला होता. या मध्ये 52 ते 55 या वाजनी गटातमध्ये तनुश्री गणेश नारकर हिने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले,तसेच तनिष विनायक खांबे याने 46 ते 48 या वजनी गटातमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले.
अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष बने, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने देवरुख सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, क्लबच्या अध्यक्षा सौ.स्मिता लाड,प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, चिन्मय साने, सौ.पूनम चव्हाण यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून काम पाहणारे स्वप्निल दांडेकर यांनाही अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष बने यांच्या हस्ते गौरवण्यात आले.