Adsense
रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

कोकण रेल्वेमार्गे जोधपूरसाठी विशेष गाडी धावणार!

रत्नागिरी : चेन्नईजवळील ताम्बरम रेल्वे जंक्शन ते राजस्थान मधील जोधपुर पर्यंत धावणारी विशेष सुपरफास्ट गाडी कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे. ही गाडी दि. 27 एप्रिल व ४ मे २०२३ रोजी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ताम्बरम – जोधपुर (06055 ) ही गाडी तांब्रम येथून दिनांक 27 एप्रिल तसेच 04 मे 2023 रोजी दुपारी २ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी ती राजस्थानात जोधपुरला पोहोचेल.

जोधपूर येथून ही गाडी (06056) दि. ३० एप्रिल तसेच ७ मे 2023 रोजी र तांब्रमसाठी सुटेल.ही साप्ताहिक सुपरफास्ट गाडी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ती तांब्रम जंक्शनला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.

ही सुपरफास्ट ट्रेन चेन्नई, एग्मोर, पेरांबूर, अरक्कोनम, f जंक्शन, कटपाडी, जोलारपेटाई जंक्शन, सेलम जंक्शन, इरोड जंक्शन, तिरुपूर, कोईम्बतूर, पलक्कड, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जंक्शन, उडूपी , मडगाव जं., रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, वसई रोड, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जं., आनंद जं., अहमदाबाद जं., मेहसाणा, पाटण, भिलडी, राणीवाडा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोकलसर , समदरी आणि लुनी स्टेशन येथे थांबणार आहे.

या गाडीला एकूण 22 एलएचबी कोच असतील. यात टू टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 08 कोच, स्लीपर – 05 कोच, जनरल – 06 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01 अशी डब्यांची रचना असेल.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button