कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक गाडी विद्युत इंजिनसह धावणार
रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गे धावणारी आणखी एक साप्ताहिक एक्सप्रेस डिझेल ऐवजी विद्युत इंजिन वर जाणार आहे. हिसार जंक्शन – कोईमतोर ही गाडी काल दि. १० मे 2023 पासून विद्युत ट्रॅक्शनवर चालवली जात आहे.
कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 22 475 22 476 ही हरियाणामधील हिसार जंक्शन ते दक्षिणेतील कोइमतूर पर्यंत धावते. आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी कोकण रेल्वे मारमार्गे चालवली जाते. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनच्या ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनच्या उपलब्धतेनुसार कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या सर्वच गाड्या विद्युत इंजिन सह चालवल्या जाणार आहेत. आता अवघ्या काही गाड्या डिझेल इंजिन सह धावत आहेत.
दि.10 मे पासून ही गाडी विद्युत इंजिन सह धावत आहे. परतीच्या प्रवास फेरीमध्ये 13 मे पासून ही गाडी विद्युत इंजिन सह चालवली जाणार आहे.