रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पोरबंदर- कोचुवेली एक्सप्रेसला उद्यापासून जादा कोच
रत्नागिरी : कोकण रेल्वे ममार्गे धावणारी पोरबंदर-कोचवेली एक्सप्रेस उद्या दि. 12 जानेवारीपासून अतिरिक्त डब्यासह धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना सध्या पर्यटन हंगामामुळे गर्दी वाढू लागली आहे. नियमित गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने ज्यादा डबे जोडले आहेत. पोरबंदर ते कोचुवेली (20910) या मार्गावर धावणाऱ्या गाडीला देखील स्लीपर शिर्डीचा एक डबा दिनांक 12 जानेवारी पासून जोडण्यात येणार आहे. या गाडीच्या परतीच्या फेरीसाठी ( 20909) दिनांक 15 जानेवारी, २०२३:रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार असल्याचे रेल्वे कळविले आहे.