ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचा प्रवास शुक्रवारपासून ‘ठंडा ठंडा कूल कूल’ !
सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसला १५ सप्टेंबरपासून वातानुकूलित दोन डबे जोडणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सामान्यांना परवडतील, असे इकॉनोमि श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. ही गाडी पूर्वीप्रमाणेच १६ डब्यांची धावणार आहे. गाडीच्या डब्यांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. उलट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने गारेगार प्रवासाची प्रवासी जनतेला भेट दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडण्याची मागणी प्रवासी जनतेकडून केली जात होती. कोकण विकास समितीने यासाठी कोकण रेल्वेकडे पाठपरवा देखील केला होता. रेल्वेने याची दखल घेत इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे दिनांक 15 सप्टेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार मडगाव -सावंतवाडी (50108), त्याच रेकसह पुढे सावंतवाडी ते दिवा (10106) मार्गावर रोज चालवली जाणारी एक्सप्रेस गाडीला दिनांक 15 सप्टेंबर पासून दिनांक 15 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. यामुळे मागील अनेक वर्षांपासून पॅसेंजर तर सध्या एक्सप्रेस म्हणून चालवली जाणाऱ्या या गाडीतून पहिल्यांदाच ‘ठंडा ठंडा कूल कूल’ असा प्रवास अनुभवता येणार आहे.
परतीच्या प्रवासात दिवा सावंतवाडी (10105), सावंतवाडी ते मडगाव (50107) ही गाडी दिनांक 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वातानुकूलित थ्री टायर दोन डब्यांचा धावणार आहे.