रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

नागपूर-मडगाव विशेष रेल्वे गाडी २६ फेब्रुवाऱीपर्यंत धावणार !

रत्नागिरी : नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला नव्या वर्षातील २६ फेब्रुवारी २३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कोकण रेल्वेमार्गे धावणार आहे.

विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. दl दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी जानेवारी २३पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने ही गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.


राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा शबनम शेख, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर, राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत, रेल्वे सल्लागार समिती सदस्य व सल्लागार ॲड. पुरुषोत्तम डांगरा, प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल कल्याण ते सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब यांनी ०११३९/०११४० नागपूर जंक्शन मडगाव (गोवा) प्रतीक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला पेण,मनमाड जं,पाचोरा जं. चाळीसगाव जं, जळगाव जं. नांदुरा, शेगांव,मूर्तीजापूर थांबा मंजूर करण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, अध्यक्ष रेल्वे बोर्ड नवी दिल्ली, रस्ते वाहतूक दळणवळण महामार्ग राजमार्ग सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे

सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ०३ वाजुन ०५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोवाला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५.४५ वाजता पोहोचेल.
मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव (गोवा) येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.


नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव बडनेरा जं, अकोला जं,मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे. दोन महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ३२ फेऱ्या होणार आहेत.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button