मिरजमार्गे धावणारी एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे धावणार
रत्नागिरी : नेहमी लोंढा -मिरज मार्गे पुण्याला जाणारी पुणे एर्नाकुलम पुणे ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे गाडी दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे. रेल्वेच्या साऊथ -वेस्टर्न लाईन वर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे ही गाडी कोकण रेल्वेच्या मार्गाने वळवली जाणार आहे.
गाडी क्रमांक 11098 ही साप्ताहिक एक्सप्रेस एर्नाकुलम ते पुणे मार्गावर लोंढा -मिरज मार्गे मार्गावर धावते. मात्र, दक्षिण पश्चिम रेल्वेने लोंढा आणि मिरज सेक्शन दरम्यान दुपदरीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे एरणाकुलम पुणे एक्सप्रेसच्या 6 फेब्रुवारी २०२३ रोजी फेरीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गाने मडगाव रत्नागिरी, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा अशी स्थानके घेत पुण्याला जाणार आहे.
या बदलामुळे 6 फेब्रुवारी रोजी चहा फेरीसाठी ही गाडी सॅनवोर्देम, कु्लेम, कॅसल रॉक, बेळगाव मिरज सांगली कराड सातारा हे थांबे घेणार नाही.