रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
होळीसाठी सुरू केलेली
होळीसाठी सुरू केलेली
रोहा-चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन उद्यापासून रद्द
रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रोहा ते चिपळूण मार्गावर सुरु करणार्यात आलेल्या मेमू स्पेशल पॅसेंजर ट्रेनच्या फेर्या दि. 9 ते 12 मार्च 2023 या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रोहा – चिपळूण (01597) ही मेमू स्पेशल गाडी दि. 9 ते 12 मार्चसाठी तर चिपळूण- रोहा (01597) ही परतीची मेमू देखील वरील कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे.
शिमगोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांच्या साईसाठी मेमू ट्रेनच्या जादा फेर्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या होत्या.