ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
कोकण रेल्वे मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर- मडगाव या द्वि साप्ताहिक एक्सप्रेससह पोरबंदर -कोचुवेली एक्सप्रेस ट्रेनला अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 12 ऑक्टोबरच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या गाडीसाठी 15 ऑक्टोबर रोजी स्लीपरचा एक जागा डबा जोडण्यात येणार आहे.
नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला (01139) दिनांक 14 ऑक्टोबरपासून थ्री टायरचा एक आणि जनरलचा एक असे दोन डबे वाढवले जाणार आहेत. तया गाडीला मडगाव ते नागपूर या फेरीसाठी 15 ऑक्टोबर पासून फ्री टायरचा एक आणि जनरल चा एक असा डबा वाढवला जाईल.
- हेही वाचा : Konkan Railway | मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा रत्नागिरी, खेडचा आरक्षण कोटा झाला दुप्पट!
- कोकण रेल्वे मार्गावर १० व १२ ऑक्टोबर रोजी ३ तासांचा ‘मेगाब्लॉक’