रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे ६ जानेवारीला अहमदाबाद -मंगळूरु वन वे स्पेशल धावणार!
रत्नागिरी : अहमदाबाद जंक्शन ते मंगळूरु अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष रेल्वे गाडी दिनांक ६ जानेवारी रोजी धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार अहमदाबाद ते मंगळुरू ही वनवे विशेष एक्सप्रेस (06072) ही शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी अहमदाबाद येथून सायंकाळी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती मंगळूरु जंक्शनला सायंकाळी ६.३० वाजता पोहोचेल.
ही गाडी वडोदरा, सुरत,वापी वसई रोड, रोहा खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सावंतवाडी, थिवी, करमाळी, मडगाव हे थांबे घेत मंगळूरूच्या दिशेने जाईल.
एकूण 22 कोचसह ही गाडी धावणार आहे. त्यामध्ये वातानुकूलित, द्वितीय श्रेणी तसेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.