ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway I कोकण रेल्वे मार्गावरील चार गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या चार एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात दि. १ ऑक्टोबर 2023 असून बदल करण्यात आला आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस (12133) ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आधीच्या 10 वाजून 2 मिनिटांऐवजी आता रात्री 9 वाजून 54 मिनिटांनी सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावणारी गरीब रथ एक्सप्रेस (12201) ही गाडी लो. टिळक टर्मिनस येथून सायंकाळी 4. 55 ऐवजी दहा मिनिटे आधी 16.45 वाजता सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावणारी द्वि साप्ताहिक एक्सप्रेस (22113) ही गाडी सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांऐवजी सुधारित वेळेनुसार 4 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे.
दि.1 ऑक्टोबर 2023 पासून वेळेत बदल करण्यात आलेली चौथी तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (16345) आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ला संध्याकाळी चार वाजून 45 मिनिटांनी येत असे. सुधारित वेळेनुसार ती पाच वाजून पाच मिनिटांनी येईल.