Konkan Railway : पुणे-एर्नाकुलम आजपासून तर मुंबई -मंगळूरु एक्सप्रेस उद्यापासून विद्युत इंजिनसह धावणार!
मुंबई : पुणे ते एर्नाकुलम एक्सप्रेस (२२१५०) आज दिनांक 15 फेब्रुवारीपासून तर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोकण रेल्वे मार्गे मंगळूर दरम्यान दर दिवशी धावणारी (१२१३३) ही गाडी दि.१६ फेब्रुवारी तर उलट दिशेच्या प्रवासात धावणारी मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (१२१३४) ही एक्सप्रेस दि. १७ फेब्रुवारी २०२३ च्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर डिझेल इंजिनसह धावणाऱ्या गाड्या इलेक्ट्रिक लोकोच्या उपलब्धतेनुसार विद्युत इंजिनसह चालवल्या जात आहेत. विजेवर चालवण्यासाठी आता अजून सहा गाड्या निवडण्यात आल्या आहेत.
डिझेल इंजिनच्या जागी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये 12223 लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम द्विसाप्ताहिक गाडी दिनांक 14 फेब्रुवारीपासून, एरणाकुलम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (12224) दिनांक 14 फेब्रुवारीपासून, पुणे ते एरणाकुलम (22150) द्वि साप्ताहिक एक्सप्रेस गाडी दिनांक 15 फेब्रुवारीपासून धाऊ लागली आहे.
पुणे जंक्शन एर्नाकुलम (२२१५०) ही कोकण रेल्वे मार्गे आठवड्यातून दोनदा धावणारी एक्सप्रेस गाडी आज दिनांक 15 रोजी सायंकाळी ६ वा. ४५ मिनिटांनी पुण्यातून एर्नाकुलमसाठी विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. इथून पुढे या गाडीच्या सर्व फेऱ्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिन जोडून होणार आहेत. एर्नाकुलम ते पुणे (22249) दि. 17 फेब्रुवारी 2023 पासून, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (11099) ही आठवड्यातून चार दिवस धावणारी गाडी 18 फेब्रुवारीपासून तर 11100 ही मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाणारी गाडी देखील 18 फेब्रुवारीपासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.
याचबरोबर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मंगळूर दरम्यान रोज धावणारी (12133) ही गाडी 16 तर उलट दिशेच्या प्रवासात धावणारी मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (12134) ही एक्सप्रेस दिनांक 17 फेब्रुवारी च्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी (10105) ही गाडी दिनांक 12 फेब्रुवारीच्या फेरीपासून तर सावंतवाडी ते दिवा दरम्यान धावणारी (10106) ही एक्सप्रेस गाडी दिनांक 13 फेब्रुवारीच्या फेरीपासून विद्युत इंजिन जोडून धाऊ लागली आहे. याच गाडीचा रेक वापरून सावंतवाडी ते मडगाव दरम्यान धावणारी दैनंदिन पॅसेंजर गाडी (50107) 12 फेब्रुवारीपासून तर मडगाव सावंतवाडी (50108) पॅसेंजर गाडी दि. 13 फेब्रुवारीपासून इलेक्ट्रिक लोको जोडून चालवली जात आहे आहे.