रत्नागिरीत आषाढी दिंडीमध्ये जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारीही सहभागी

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी, दि. २५ जुलै : आषाढी एकादशी निमित्त प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या वारीमध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे या सुद्धा पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी माऊलींची पालखी देखील खांद्यावर घेतली. असंख्य भक्तगणांसह सहभागी होण्याचा सुखद अनुभव प्राप्त झाल्याची माहिती नगरसेवक राजीव कीर यांनी दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment