जि. प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे मुलांनी केली परसबाग लागवड!

Team RatnagiriLive
2 Min Read

लांजा :  शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे शुक्रवार दि. २८ जून रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेत होते. सदर उपक्रमासाठी शाळेतील इ.१ली ते ७ वीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती. या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभणार असून, शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरावयाच्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक, चवीष्ट आहार मिळणार आहे.


शाळे मध्ये परस बाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टर च्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून ,अळी तयार करून पाले भाजी, पडवळ,काकडी, टोमॅटो,मिरची,वांयगे,घेवडा, दोडका,कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात व पेरण्यात आली शिक्षणा सोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी ह्या साठी हा आज उपक्रम शाळे मध्ये राबविण्यात आला.

या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग साहेब, केंद्र प्रमुख श्री. पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अनुजा पांचाळ, नगरसेविका सौ. दुर्वा भाईशेट्ये, शाळा सुधार समिती सदस्य प्रसाद भाईशेट्ये, बाबू पांचाळ, ट्रॅक्टर मालक श्री. कैलास उपशेटे, बैल व नांगरमालक वसंत कुंभार, तुकाराम कुंभार, राजू तुळसणकर, नरेश कुंभार, फिरोज नेवरेकर, सौ. दुबळे, सौ. संजीवनी पांचाळ, सौ.मुगारी, सौ.पांचाळ, सौ.शिगम, श्री. राजेश कांबळे , मुख्याध्यापक श्री.मनोज रेडिज, शिक्षिका सौ. दिपाली यादव, सौ. दीपा मुळ्ये, सौ. रूक्मिणी कदम-पाटील या सर्वांनी सहभाग घेतला खास करून जागा मालक यांचे आभार दिलीप तोडकरी संजय तोडकरी विलास तोडकरी यांनी परस बागेसाठी जागा उपलब्ध करून दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment