देवरुखचे सुपुत्र विजय हातिस्कर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरूख (सुरेश सप्रे) : मुंबई पोलीस दलातील एसीपी व देवरुखचे सुपुत्र विजय मोहन हातिस्कर यांना पोलिसातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

विजय हातिस्कर हे मुळचे रत्नागिरी मिऱ्या येथील आहेत. वडील मोहन हातिस्कर हे नोकरीनिमित्त देवरूखात आले व स्थाईक झाले. विजय (बाळू) यांचा जन्म देवरूखात झाला.

हातीसकर प्राथमिक शिक्षण भोंदे शाळेत तर माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल देवरूख येथे झाले. सन१९८१ला एससीसी झालेवर उच्च शिक्षण रत्नागिरीत झाले. विद्यार्थीदशेपासुन पोलीस निरीक्षक होण्याचे ध्येय बाळगलेले विजय हे १९९२ला पोलीस दलात निरिक्षक म्हणून दाखल झाले. विजय हातिसकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरिता १५ आॅगस्ट २०२४ रोजी राष्ट्रपती चे पदक जाहीर झाले.

हातीसकर रायगड, सिंधुदुर्ग. मुंबई येथे काम केले. १७ वर्ष मुंबई येथे सेवेत असून रायगड व मुंबई मध्ये आरसीएफ, मालाड या पोलीस ठाण्यात मध्ये अनेक तपास केलेल्या गंभीर गुन्हा मध्ये आरोपींना शिक्षा लागलेली आहे. अनेक फरारी आरोपी पकडले असुन अनेक गंभीर गुन्हे ची उकल केली आहे.

सध्या मुंबई पोलिसात ACP या पदावर सेवा बजावत आहेत. विजय हे सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी येथे आपल्या कामाचा ठसा उमटवून सेवा निवृत्त झालेले उप अभियंता संजय हातिस्कर यांचे कनिष्ठ बंधू आहेत.

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यासह जिल्हाभरातू त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment