वंदे भारत एक्सप्रेस आता भगव्या रंगातही झळकणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

चेन्नईतील आयसीएफमध्ये नव्या रंगसंगतीमधील गाड्यांची निर्मिती

रत्नागिरी : निळ्या पांढऱ्या रंगसंगती बरोबरच आता यापुढे निळ्या रंगाच्या ठिकाणी भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस देखील देशातील रेल्वे मार्गावर धावताना दिसणार आहे. चेन्नईमधील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीत ( आयसीएफ ) भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस गाड्या आकार घेत आहेत.


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी चेन्नई मधील आयसीएफ या रेल्वे गाड्या बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली आणि तेथे सुरू असलेल्या निर्माण कार्याचा आढावा. शनिवारी हा आढावा घेतल्यानंतर देशवासीयांसमोर निळ्या व भगव्या रंगातील वंदे भारत एक्सप्रेस प्रथमच आली. आता निळ्या रंगाच्या ठिकाणी भगव्या रंगाची शेड असलेल्या वंदे भारत गाड्यांची निर्मिती सुरू असल्याचे पुढे आले आहे. पांढऱ्या रंगासह भगव्या रंगातील शेडयुक्त वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भारतीयांच्या पसंती उतरतील, असा विश्वास, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाचा क्षण
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment