विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन रद्द

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी ३१ : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. शासन परिपत्रक क्र. प्रसुधा 2011 /प्र.क्र.189/11/18- अ, 26 सप्टेंबर 2012 मधील परिच्छेद 5.7 नुसार, आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये अशा सूचना आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी लागू झाली आहे. त्यामुळे माहे नोव्हेंबर 2024 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार नाही, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे तहसिलदार सर्वसाधारण, बजरंग चौगुले यांनी कळविले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment