महाराष्ट्रशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजी
ग्लोबीकाॅन कंपनीकडून आवरे शाळेत संगणक कक्षाचे उदघाटन
उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : ग्लोबीकाॅन कंपनी यांनी उरण तालुक्यातील आवरे येथील जिल्हा परिषद शाळेस १० लॅपटॉप भेट दिले. त्या प्रित्यर्थ संगणक कक्ष उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी कंपनी हेड शकील इनामदार, मनिष म्हात्रे, प्रज्वल सकपाळ यांनी संगणक कक्षाचे उद्घाटन केले.यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य डी.ए .गावंड, प्रवीण भगत, सुभाष गावंड, संदिप गावंड, खोपटे शाळेचे मुख्याध्यापक गोंधळी सर व महिला सदस्य उपस्थित होत्या.
यावेळी समाधान गावंड यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थना पुस्तकाचे वाटप केले.सूत्रसंचालन बबन पाटील यांनी केले. यावेळी अध्यक्ष शंकर पाटील, अरूणा तिरमाळी, गणेश गावंड, पूजा चव्हाण,म्हतू आहेर, रूपाली चव्हाण ,रचना गावंड यांचे सहकार्य लाभले.निर्भय म्हात्रे यांनी आभार मानले.