शिवसेनेकडून उद्या जनता दरबाराचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मराठी भाषा मंत्री उदय सामंत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

मुंबई : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यासाठी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे उद्या सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ११  या वेळेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता उपस्थित राहणार आहे.  सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment