जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा १२ वीचा निकाल १०० टक्के

Team RatnagiriLive
2 Min Read

नाणीज : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित नाणीज येथील जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टीट्यूट या प्रशालेचा बारावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. बारावी सायन्स शाखेत ज्योतिरादित्य पाटील व कॉमर्स शाखेत लखन बाळकुंडे हे प्रशालेत प्रथम आले. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.प्रशालेचा सविस्तर निकाल असा- बारावी सायन्स शाखेमध्ये ज्योतिरादित्य पाटील यांने ७६.५० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर अनिरुद्ध नावले ७५ टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय आला. रिया शेणवी व सुयश सोनकांबळे या दोन विद्यार्थ्यांनी ७४.८३ टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याचबरोबर कॉमर्स शाखेमध्ये लखन बाळकुंडे या विद्यार्थ्याने ७८.३३ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला. कु. श्रिया विभुते या विद्यार्थिनीने ७७ टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय क्रमांक व भाविक पाटील या विद्यार्थ्याने ७६.३३ टक्के गुण प्राप्त करत प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थान व प्रशालेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी व प.पू. कानिफनाथ महाराज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले आहेत. तसेच इन्स्टिट्यूटचे चेअरमन अर्जुन फुले, मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. त्यामुळे नाणीज दशक्रोशीतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना यामुळे दर्जेदार व पूर्णपणे मोफत शिक्षण घेणे शक्य झाले आहे. येथे उत्तम शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवले जातात. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विविध खेळ, क्रीडा स्पर्धा अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न या प्रशाले मध्ये केला जातो.
येथे उत्तम भौतिक सुविधा असलेली इमारत आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, अशा अनेक सुविधा येथे पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
यावर्षीपासून प्रशालेमध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment