६१ लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणी संशयिताला गुजरातमधून अटक

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : स्वतःला “मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन” विभागातून बोलत असल्याचे सांगून, त्यांचे सीमकार्ड बंद होणार असल्याची भीती दाखवून सायबर फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीस गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या फसवणुकीत तब्बल रु. 61,19,080/- ची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.फिर्यादी यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार असल्याचे सांगून, बनावट पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला. त्यासाठी कॅनरा बँकेत नवीन खाते उघडण्यात आले. या खात्यातून २ कोटी रुपयांचा व्यवहार दाखवून, फिर्यादी यांना भीती दाखवत त्यात स्वतःची रक्कम भरण्यास भाग पाडले गेले.सायबर पोलिस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा क्र. 05/2024 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(सी), 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी नेपाल निताई चरण जना (रा. सुरत, गुजरात; मूळ रा. पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याची ओळख पटली. पोलिस पथकाने गुजरात येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले असून, त्यास न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. श्रीमती स्मिता सुतार आणि त्यांच्या टीमने मोलाची भूमिका बजावली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment