रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी  : मागील काही दिवस हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरवत संततधार कोसळणाऱ्या पावसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता प्राप्त इशाऱ्यानुसार पुढील तीन तास जिल्ह्यात मुसळधार पाऊस  कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड दापोली मार्ग तेथील रस्ता वाहून गेल्याने बंद झाला आहे. दापोलीत वणंद पावसाचे पाणी आलेला नदीपूल पार करीत असताना एक जण वाहून गेला आहे.

चिपळूण खेडसह रत्नागिरी तालुक्यात देखील पडझडीच्या घटना घडल्या आहेत. अशातच मंगळवारी सकाळी नऊ वाजता पुन्हा एकदा जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment