माजी सभापती विनोद झगडे यांचा शिवसेनेत प्रवेश

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : ठाणे येथे माजी सभापती विनोद झगडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारून पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह बाळासाहेब शिंदे, प्रसाद लाड, सचिन बामणे, सुधीर कदम, सतीश शिंदे, सुरेश गोलमडे यांचासह साठ पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या ऐतिहासिक पक्षप्रवेशासाठी 100 गाड्यांचा भव्य ताफा घेऊन झगडे समर्थकांनी मुंबईत धडक दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे रत्नागिरीतील शिवसेनेचे ताकद वाढली असून शिंदे साहेबांचे बळ अधिक वाढणार आहे.

या सोहळ्याला चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, रोहन बने यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment