शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश अर्ज भरण्यास १६ जूनपर्यंत मुदत

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. १२ :  दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी 20 मे 2025 पासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 16 जून 2025 आहे.

ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी http: poly25.dtemaharshtra.gov.n या संकेत स्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती साठी मुदत 16 जून 2025 पर्यंत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी 18 जून 2025 रोजी प्रकाशित होईल तर गुणवत्ता यादीवरील आक्षेप 19 ते 21 जून 2025 पर्यंत नोंदविता येतील. अंतिम गुणवत्ता यादी 23 जून 2025 रोजी प्रकाशित करण्यात येईल.
कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय हा ई स्क्रूटिनी (ऑनलाईन स्क्रूटिनी) व दूसरा पर्याय हा पी स्क्रुटिनी (ऑफलाईन स्क्रूटिनी) आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय तंत्रनिकेतन येथे मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहितीसाठी अ. आ. मुळये ९८९०४७६९९५, नु. तौ. काझी ९२८४५०६०५२, निरज मावला ८८०६०९१७६५ या प्राध्यापकांच्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment