जेएनपीटी टाऊनशिप येथे ब्लॅक बेल्ट, डिग्री सर्टिफिकेट अवॉर्डसह सर्टिफिकेट वाटप

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शोतोकोन कराटे टू स्पोर्ट्स असोशिएशन (एस के एस ए,) यांच्या मान्यतेने जेएनपीटी टाऊनशिप येथे ब्लॅक बेल्ट,डिग्री सर्टिफिकेट अवॉर्ड, तसेच कराटे बेल्ट एक्झाम सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.

दि. २४ जून २०२५ रोजी जेएनपीटी टाऊनशिप येथे ब्लॅक बेल्ट डिग्री सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. S K S A महाराष्ट्र प्रेसिडेंट विकास भोईर व दीपक घरत यांना फोर्थ डिग्री ब्लॅक बेल्ट (Yondan) देऊन गौरवण्यात आले. तसेच अजय तांडेल,प्रगती घरत, सोनल तांडेल, मिलन जाधव व किरण हर्गीवाड यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट(nidan ) देऊन व अथर्व कडू,साईराज कडू, आशीर्वाद सिंग, ओंकार माने, सचिन गावंड,यांना फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट (shodan)देऊन गौरवण्यात आले. तसेच एकूण ६६ मुलांना विविध कॅटेगिरी मध्ये कलर बेल्ट एक्झॅम सर्टिफिकेट देण्यात आले. अतिशय जल्लोषाच्या वातावरणात हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.

रायगड मध्ये सर्वात मोठी अशी बेल्ट एक्झाम घेण्यात आली होती. विजय भोईर रायगड जिल्हा परिषद सदस्य यांनी सर्वांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment