रत्नागिरीत उद्या AI तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग विषयावर कार्यशाळा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. 25 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून हा सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून “कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन उपयोग” या विषयावर कार्यशाळेचे 26 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजता या कालावधीमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव येथे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment