ओणी-पाचल मार्गावर एसटी बस-टेम्पोच्या अपघातात चालकासह चौघे जखमी

Team RatnagiriLive
1 Min Read

राजापूर : राजापूर तालुक्यातील ओणी- पाचल मार्गावर पाचल येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्‍या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस तसेच दुध वाहतूक करणाराvटेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एसटी वाहकासह एक विद्यार्थी व टेम्पो चालक व क्लिनर असे चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 8.15 वाजण्याच्या दरम्यान सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर हा अपघात झाला.

या ठिकाणी चढावाला असलेल्या एस. टी. बसला समोरून भरधाव वेगात येणार्‍या आयशर टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघाता नंतर हा आयशर टेम्पोही रस्त्याच्या बाजुला कोसळला. तर एसटी बसही रस्त्याच्या बाजुला कलंटली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment