नांदेड, धाराशिव, सोलापूर, रत्नागिरीसह बीड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा – IMD मुंबई

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई, ८ जून २०२५ : भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई यांनी ताज्या हवामान अंदाजानुसार नांदेड, धाराशिव, सोलापूर, रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांमध्ये मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणारे वारे येण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने या जिल्ह्यांतील नागरिकांना सावध राहण्याचे व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः खुल्या ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणे टाळावे, विजेपासून बचावासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असेही सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या सूचना

शेतकरी व प्रवाशांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे.

वीज पडण्याच्या शक्यतेमुळे सुरक्षेच्या उपाययोजना घ्याव्यात.

स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

अधिकृत माहिती व सततचे अपडेट्ससाठी IMD मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक प्रशासनाकडून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment