रत्नागिरीच्या २० विद्यार्थ्यांचा थेट अमेरिकेत ‘नासा’कडे प्रवास!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • USA – NASA STUDY TOUR 2025


मुंबई : रत्नागिरी जिल्हा परिषद व रत्नागिरी नगर परिषद यांच्या प्राथमिक शाळांतील २० हुशार विद्यार्थ्यांची निवड USA – NASA Study Tour 2025 साठी झाली असून, या सर्व विद्यार्थ्यांची रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  मुंबई येथे  भेट घेत नासा दौऱ्यावर निघालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून इतक्या विद्यार्थ्यांना नासाच्या अभ्यासदौर्‍यासाठी पाठवले जात आहे. हे रत्नागिरीसाठी गौरवाचे आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणेचे क्षण आहेत.

डॉ. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य

विज्ञान आणि संशोधनाच्या वाटचालीत उडी घेणाऱ्या या नव्या पिढीचे हे पहिले पाऊल त्यांना एक नवी दिशा देईल, याचा विश्वास वाटतो. शिक्षण, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर रत्नागिरीच्या मातीतून थेट नासापर्यंतचा प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी नासा दौऱ्यासाठी निघालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment