खुशखबर!! गणपतीसाठी गुजरातमधून रत्नागिरीपर्यंत गुरुवारपासून विशेष ट्रेन धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • कोकणात येणारे भाविकांसाठी पश्चिम रेल्वे गणेश चतुर्थीसाठी चालवणार स्पेशल ट्रेन
  • उधना ते रत्नागिरी मार्गावर वसईमार्गे धावणार गणपती स्पेशल ट्रेन

रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, पश्चिम रेल्वे (WR) उधना ते रत्नागिरी दरम्यान गणपती स्पेशल ट्रेन चालवणार आहे. ही गाडी दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत साप्ताहिक चालवली जाणार आहे.

​ट्रेन क्रमांक 09022 साठी आरक्षण दि. 20.08.2025 पासून सर्व पीआरएस (PRS) काउंटरवर आणि आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाइटवर सुरू होईल.

गणेश चतुर्थीच्या या काळात अनेक प्रवासी आपल्या गावी परत जातात, त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या स्पेशल ट्रेनमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीच्या अधिक माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment