चिपळूण : सातारा जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात चिपळूण तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात प्राण गमावलेले दोघेही चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या अपघातासंदर्भातील सविस्तर तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे. मात्र, मृत्यूमुखी पडलेले दोघेही खेर्डी (ता. चिपळूण) येथील असल्याचे सातारा येथून कळवण्यात आले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही वडील -मुलगी असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची अधिक माहिती प्राप्त होताच अपडेट दिले जाईल.
सूचना: सोशल मीडिया पोस्ट किंवा ग्राफिकसाठी वरील छायाचित्र प्रतिकात्मक म्हणून वापरता येईल.
![]()
