महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणस्पोर्ट्स

Ratnagiri | ईगल तायक्वांदोच्या खेळाडूंची भरारी

रत्नागिरी  : नुकत्याच झालेल्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत ईगल तायक्वांदो सेंटरच्या खेळाडूंनी पदार्पणातच चांगली भरारी घेतली.

अभ्युदय नगर इथल्या नगरपरिषद बहुउद्देशीय सभागृह येथील ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणारे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातील क्योरोगी म्हणजेच (फाईट) या प्रकारात पीवी गटात 14 किलो वजनाखाली आर्या रोशन ढवण हिने सुवर्णपदक मिळवले. सब जुनिअर मुलींच्या 32 किलो खालील गटात आराध्या सागर लोखंडे हिने रौप्य पदक मिळवले. तर नायशा मयूर कांबळे हिने पुमसे या प्रकारात पेअरमध्ये रौप्य आणि ग्रुपमध्ये कास्यपदक मिळवले.

या खेळाडूंना ईगल तायक्वांदो सेंटरच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत आणि सह प्रशिक्षिका सई संदेश सावंत यांच्याकडे हे खेळाडू घडत असून त्यांना युवा तायक्वांदो चे प्रमुख प्रशिक्षक राम करा आणि शशी रेखा करा यांचेही अधिक मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून तसंच अनुक्रमे दामले विद्यालय, सर्वंकष विद्यामंदिर आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button