गणपती उत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या ८ विशेष गाड्या जाहीर

Team RatnagiriLive
2 Min Read
  • कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर!
  • महाराष्ट्रात प्रवास संपणाऱ्या  सर्वाधिक गाड्या

मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ८ मार्गांवर गणपती विशेष गाड्यांची (Ganpati Special Trains) घोषणा केली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेनेही विशेष गाड्यांची घोषणा केली होती. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

​पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पालघरसह गुजरात आणि लगतच्या भागातील कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्यांची प्रमुख वैशिष्ट्ये

  • विविध स्थानकांपासून सुरुवात: मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, वडोदरा, विश्वामित्री, उधना आणि वलसाड या प्रमुख स्थानकांवरून कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
  • अनारक्षित गाडी (Unreserved Train): बांद्रा टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी अनारक्षित (Unreserved) विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक गाड्या: यंदाच्या नियोजनात महाराष्ट्रात प्रवास संपणाऱ्या (Terminating) सर्वाधिक गाड्यांचा समावेश आहे.

तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांची लगबग

विशेष गाड्यांची घोषणा होताच कोकणात जाणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर आणि रेल्वे तिकीट खिडकीवर आरक्षण मिळवण्यासाठी प्रवाशांची मोठी लगबग सुरू झाली आहे.

गणपती स्पेशल गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे 👇👇👇

1️⃣ 09013 / 09014 मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक विशेष) फेऱ्या
०९०१३ (मुंबई सेंट्रल वरून मंगळवार, १५ सप्टेंबर)
०९०१४ (ठोकूर वरून बुधवार, १६ सप्टेंबर)
वेळापत्रक:
09013: मुंबई सेंट्रल सुटणार १०:४५ (मंगळवार) ➔ ठोकूर पोहोचणार ०८:५० (बुधवार).
09014: ठोकूर सुटणार ११:०० (बुधवार) ➔ मुंबई सेंट्रल पोहोचणार ०७:४० (गुरुवार).
थांबे: बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, उडुपी आदी.

2️⃣ 09019 / 09020 मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल. (आठवड्यातून ४ दिवस)*
फेऱ्या
09019 (मुंबई सेंट्रल कडून): बुध, शुक्र, शनि, रवि (११, १२, १३, १६, १८, १९, २०, २३ सप्टेंबर)
09020 (सावंतवाडी कडून): गुरु, शनि, रवि, सोम (१२, १३, १४, १७, १९, २०, २१, २४ सप्टेंबर)
वेळापत्रक:
09019: मुंबई सेंट्रल सुटणार १०:४५ ➔ सावंतवाडी रोड पोहोचणार ०२:३० (दुसऱ्या दिवशी).
09020: सावंतवाडी रोड सुटणार ०४:५० ➔ मुंबई सेंट्रल पोहोचणार २०:१० (त्याच दिवशी).
थांबे: बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप.

3️⃣ 09035 / 09036 वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी – वांद्रे टर्मिनस (साप्ताहिक – अनारक्षित / Unreserved) फेऱ्या
०९०३५ (वांद्रे वरून गुरुवार: १७ व २४ सप्टेंबर)
०९०३६ (रत्नागिरी वरून शुक्रवार: १८ व २५ सप्टेंबर)
वेळापत्रक:
09035: वांद्रे (T) सुटणार १४:२० (गुरुवार) ➔ रत्नागिरी पोहोचणार ००:३० (शुक्रवार).
09036: रत्नागिरी सुटणार ०१:३० (शुक्रवार) ➔ वांद्रे (T) पोहोचणार १२:३० (शुक्रवार).
थांबे: बोरीवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड.

4️⃣ 09114 / 09113 वडोदरा – रत्नागिरी – वडोदरा (साप्ताहिक) फेऱ्या
०९११४ (वडोदरा वरून मंगळवार, १५ सप्टेंबर)
०९११३ (रत्नागिरी वरून बुधवार, १६ सप्टेंबर)
वेळापत्रक:
09114: वडोदरा सुटणार ११:१५ (मंगळवार) ➔ रत्नागिरी पोहोचणार ००:३० (बुधवार).
09113: रत्नागिरी सुटणार ०१:३० (बुधवार) ➔ वडोदरा पोहोचणार १७:३० (बुधवार).
थांबे: भडोच, सूरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड.

5️⃣ 09110 / 09109 विश्वामित्री – रत्नागिरी – विश्वामित्री (द्वि-साप्ताहिक) फेऱ्या
09110 (विश्वामित्री कडून): बुधवार व शनिवार (१२, १६, १९, २३ सप्टेंबर)
09109 (रत्नागिरी कडून): गुरुवार व रविवार (१३, १७, २०, २४ सप्टेंबर)
वेळापत्रक:
09110: विश्वामित्री सुटणार १०:०० ➔ रत्नागिरी पोहोचणार ००:३० (दुसऱ्या दिवशी).
09109: रत्नागिरी सुटणार ०१:३० ➔ विश्वामित्री पोहोचणार १७:३० (त्याच दिवशी).

6️⃣ 09124 / 09123 विश्वामित्री – रत्नागिरी – विश्वामित्री (साप्ताहिक – सोमवार) फेऱ्या
१४ व २१ सप्टेंबर (सोमवार)
09124: विश्वामित्री सुटणार ०५:५५ (सोमवार) ➔ रत्नागिरी पोहोचणार २०:०० (सोमवार).
09123: रत्नागिरी सुटणार २१:०० (सोमवार) ➔ विश्वामित्री पोहोचणार ११:४५ (मंगळवार).

7️⃣ 09022 / 09021 उधना – रत्नागिरी – उधना (साप्ताहिक – गुरुवार) फेऱ्या
१७ व २४ सप्टेंबर (गुरुवार)
वेळापत्रक:
09022: उधना सुटणार ०८:०५ (गुरुवार) ➔ रत्नागिरी पोहोचणार २०:०० (गुरुवार).
09021: रत्नागिरी सुटणार २१:०० (गुरुवार) ➔ उधना पोहोचणार १०:२० (शुक्रवार).

8️⃣09030 / 09029 वलसाड – रत्नागिरी – वलसाड (साप्ताहिक)
फेऱ्या: ०९०३० (वलसाड वरून सोमवार, १४ सप्टेंबर)
०९०२९ (रत्नागिरी वरून मंगळवार, १५ सप्टेंबर)
वेळापत्रक:
09030: वलसाड सुटणार १४:५० (सोमवार) ➔ रत्नागिरी पोहोचणार ०२:३० (मंगळवार).
09029: रत्नागिरी सुटणार ०३:१० (मंगळवार) ➔ वलसाड पोहोचणार १६:१५ (मंगळवार).

सणासुदीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर होणारी प्रचंड गर्दी पाहता, या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळावरून वेळापत्रक तपासून वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment