Ratnagiri | गावडे आंबेरे येथे दुचाकीवरून जाणाऱ्या मुलावर बिबट्याची झडप

Team RatnagiriLive
1 Min Read
गावडे आंबेरे

रत्नागिरी : तालुक्यातील गावडे आंबेरे बिर्जेवाडी येथे दुचाकीवरून जात असलेल्या मुलावर बिबट्याने झडप घालून जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तेजोमय जगदीप डोर्लेकर (१५, रा. गावडे आंबेरे, रत्नागिरी (Ratnagiri ) असे जखमी मुलाचे नाव आहे. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेतेजोमय हा भाऊ प्रथमेश डोर्लेकर पाच्यासोबत दुचाकीवर मागे बसून पूर्णगड येथे गेला होता पुन्हा घरी

गावडे अबिरेत परत येत असताना सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बिर्जेवाडी येथे चढावात बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. यावेळी बिबट्याने दुचाकीवर मागे बसलेल्या तेजोमयच्या पायावर पंजा मारून दुखापत केली या हल्ल्यात जखमी झालेल्या तेजोमयला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment