Raigad News : उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी

Team RatnagiriLive
1 Min Read
  1. रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक उलवे शहर मनसे तर्फे सत्कार
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : रायगड (Raigad) जिल्हा परिषद उलवे, केंद्र वहाळ, तालुका पनवेल येथील शाळेची विद्यार्थिनी कु. समिक्षा महेश मढवी हिने महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समिक्षाने रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक, तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उलवे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
समिक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उलवे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तिच्या घरी जाऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी समिक्षाचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कारप्रसंगी उलवे शहराचे माजी अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील, पनवेल तालुका सचिव निर्दोष केशव गोंधळी, गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार सुनील म्हात्रे तसेच गव्हाण विभाग उपाध्यक्ष बबलू जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
समिक्षाने मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेचे प्रतीक असून, तिच्या यशामुळे उलवे परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता आहे, हे समिक्षाने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment