रत्नागिरी, दि. १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट
२०२६ रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे (Ratnagiri) पालकमंत्री डॉ.
उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता पोलीस परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. अशी
माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या
संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
